रतन टाटांनी लग्न का केलं नाही?, समोर आलं सर्वात मोठं कारण

मुंबई | रतन टाटा (ratan tata reveals his life story) एक असं नाव आहे. ज्यांना ज्याबद्दल वेगळी कोणती ओळख सांगायला नको. बरेच लोक त्यांना आपले प्रेरणास्थान मानतात.

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 साली गुजरात राज्यातील सुरत (Ratan Tata Birth place) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा, तर आईचे नाव सोनी टाटा होते. टाटांनी आपले उच्चशिक्षण परदेशात घेतले.

त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल खूप कमी आणि क्वचितच चर्चा केली जाते, परंतु लोकांच्या मनात एक प्रश्न कायम येतो, तो म्हणजे इतके यश मिळवल्यानंतर देखील या दिग्गज व्यक्तीने कधीच लग्न का केलं नाही? खुद्द रतन टाटा यांनी एका मुलाखती दरम्यान याचं उत्तर दिलं आणि आपल्या लव्ह लाईफ बद्दलही खुलासा केला.

टाटा उद्योग समुहाचे माझी प्रमुख रतन टाटा यांनी आपल्या आयुष्यात उद्योग क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलं. पण त्यांनी संपूर्ण आयुष्यभर लग्न केलं नाही. असं असंल तरी रतन टाटांनी कधीच प्रेम केलं नाही असंही नाही. रतन टाटा एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल चार वेळा प्रेमात पडले.

रतन टाटा यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की जेव्हा ते अमेरिकेत राहत होते तेव्हा ते प्रेमाबाबत सर्वात जास्त गंभीर होते. हे प्रकरण इतके गंभीर होते की दोघांनाही लग्न करायचे होते. पण रतन टाटा यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि बसलेली घडी कायमची फिसकटली. आपल्याला देशात परत यायचे होते पण त्यांच्या प्रेयसीला अमेरिकेतच राहायचं होतं आणि यामुळेच त्यांची साथ कायमची सुटली.

रतन टाटा म्हणतात की मी अविवाहित राहिलो हेच खूप बरं झालं. कारण जर त्यांनी लग्न केले असते तर कदाचित ही परिस्थिती अजूनच बिघडली असती.

न्यूयॉर्कमधील कॉर्नेल युनिव्हर्सिटी ऑफ आर्किटेक्चर या विद्यापीठाचे ते विद्यार्थी आहेत. त्यानंतर लॉस अँजेलिसमधील जॉन्स अँड एमन्स या कंपनीत त्यांनी काही काळ काम केलं.

पुढे 1962 मध्ये भारतात आल्यानंतर वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी टाटा ग्रुप्समध्ये (Ratan Tata Education) काम करण्यास सुरुवात केली.

कित्येक कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर त्यांची नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडच्या संचालकपदी नेमणूक झाली. दरम्यान, 1975 मध्ये बोस्टनमधील हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून त्यांनी ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम पूर्ण केला.

महत्वाच्या बातम्या-

नव्या वर्षात वजन घटवायचंय?, फक्त या 5 गोष्टी करा, चमत्कार होईल 

Omicron पासून वाचण्यासाठी असा करा स्वत:चा बचाव; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला 

पुढील 24 तास महत्त्वाचे; राज्यातील काही भागात पावसाची शक्यता 

‘या’ महिन्यात भारतात दररोज 2 लाख रूग्ण आढळतील, तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ 

“…त्यावेळी मला अनेकांनी वेड्यात काढलं”; द डर्टी पिक्चरबाबत विद्या बालनचा खुलासा