सर्व आमदारांसाठी गुड न्यूज; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील आमदारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या आमदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. आमदार निधीत दोन कोटींची वाढ केली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. काँग्रेसच्या आमदार आराधना मोना यांनी योगींकडे आमदार निधी वाढवण्याची मागणी केली होती.

योगींनी सकारात्मक प्रतिसाद देत नवी घोषणा केली आहे. योगींनी आपल्या भाषणात यावेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरही निशाणा साधला.

राज्यात आज शेणापासून अगरबत्ती आणि धूपबत्ती देखील तयार केली जात आहे. जर ते गौसेवा करणारे असते तर त्यांच्या भाषणात याचा नक्कीच उल्लेख असता, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांनी केली.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या सदस्यांचा वार्षिक निधी आत्तापर्यंत 3 कोटी रुपये होता. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या सरकारमध्ये फेब्रुवारी 2020 मध्ये आमदार निधी 2 कोटी रुपयांवरून 3 कोटी रुपये करण्यात आला.

यापूर्वी, योगी सरकारमध्येच 2019 मध्ये आमदार निधी वार्षिक 1.5 कोटी रुपयांवरून 2 कोटी रुपये करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या-  

Hyundai ची Mahindra ला जोरदार टक्कर; ‘ही’ जबरदस्त कार लवकरच बाजारात येणार 

Avinash Bhosale | अविनाश भोसले यांना न्यायालयाचा झटका 

राज्यसभेसाठी बाहेरचा उमेदवार दिल्याने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ?; ‘या’ नेत्याने उचललं मोठं पाऊल 

“अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, पण दिल्लीसमोर झुकणार नाही” 

“बहुजनांची पोरं आजा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही”