“…अन्यथा आम्ही तुमच्या वयाचा विचार न करता तुमचं धोतर फेडू”

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावरून सध्या राज्यात वाद पेटल्याचं पहायला मिळतोय.

‘चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कोण पुछेगा और समर्थ के बिना शिवाजी को कोण पुछेगा’, असं राज्यपाल कोश्यारी यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात म्हटलं होतं. त्यानंतर आता वाद पेटला आहे.

राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर आता राज्यातील अनेक नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. अशातच आता मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील यांनी राज्यपालांना थेट इशारा दिलाय.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी काल शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं. माहिती नसलेला इतिहास आमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, असं विनोद पाटील म्हणाले.

खरं तर हे बघितल्यानंतर राज्यपालांच्या पोटात जे होतं, ते ओठावर आलंय, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराज कळले नसतील, तर कृपया त्या विषयात नाक खुपसू नका, असंही ते यावेळी म्हणाले.

चुकीच्या गोष्टी आमच्यासमोर मांडू नका. तुमच्या वयाचा विचार करता, तुम्हाला आता निवृत्तीची गरज आहे, हे कालच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालंय, अशी खोचक टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

ज्या राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराजच कळलेले नाहीत असे राज्यपाल महाराष्ट्राला नको, त्यामुळे राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

राज्यपाल महोदय, आपण तत्काळ माफी मागावी, अन्यथा आम्ही तुमच्या वयाचा विचार न करता गरज पडली तर तुमचं धोतर फेडू, असंही विनोद पाटील यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर आता राज्यात चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना घेरण्यास सुरूवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

संभाजीराजेंच्या हातून सुटलं संयोगिताराजेंचं उपोषण; कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

“छत्रपतींचा अपमान करणारे छिंदम प्रवृत्तीचे लोक एकाच पक्षात कसे?”

सावधान! कोरोना अजून संपला नाही, लवकरच चौथी लाट येणार; तज्ज्ञांचा दावा

“मी शरद पवारांचं राजकारण नासवलंय, पवारांचा सच्चा सैनिक म्हणविणारे…”

 “राज्यपाल महोदय, छत्रपतींचा अपमान खपवून घेणार नाही, तुमच्या ‘चहा’ छाप सैनिकांनी…”