सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडीओ तुम्ही नक्कीच पाहिले असतील. यातील काही व्हिडीओ आपलं चांगलंच मनोरंजन करून जातात. तर काही व्हिडिओतील प्राण्यांची मस्ती नकळत आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटवते. या प्राण्यांचा स्मार्टनेस, निरागसपणा आणि हुशारी पाहून बहुतेकदा थक्क व्हायला होतं.
सध्या सोशल मीडियावर असाच जंगलाचा राजा असणाऱ्या सिंहाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सिंह म्हटलं की, भ.यानक हिं.स्त्र प्राणी, जंगलातील इतर पशू पक्षी ज्याला घाबरतात असा प्राणी, असंच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचं देखील सिंहाविषयी मत बदलेल.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये शि.कारीत एकदम तरबेज असणारा सिंह एका बदकासोबत खेळत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ एका जंगलातील असल्याचं व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येतं.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बदक पाण्यात मस्तपैकी पोहण्याचा आनंद घेत असतं. यावेळी अचानक एक सिंह तिथे येतो. हा सिंह बदकाला पंजाने खाली दाबण्याचा प्रयत्न करतो. यामुळे बदक प्रचंड घाबरते आणि ते पळण्याचा प्रयत्न करते.
आयएफएस ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्यांनी लिहिलं आहे की, जंगलाचा राजा असलेला सिंह किती प्रेमळ मनाचा आहे. तो हिं.स्र प्राणी आहे. पण उगाच कुणाला नाहक त्रास देत नाही हेच यातून दिसतं.
हा व्हिडीओ केवळ 25 सेकंदाचा आहे. मात्र, नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला 25 हजाराहून अधिक व्ह्यूवज आल्या आहेत. तर 3 हजारांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.
दरम्यान, अनेकांनी हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच या सिंहाचं कौतुक देखील केलं आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ नक्की पाहा.
How many of you had thought that such large carnivores has a soft heart?
They are wild. But not savages. Respect & adore them. They kill to survive & only when provoked. pic.twitter.com/RwoJ1z1Hjc
— Susanta Nanda IFS (@susantananda3) March 25, 2021
महत्वाच्या बातम्या-
‘वाह! क्या बात है’; या मुंगुसाचा अभिनय पाहून तुम्ही देखील अवाक् व्हाल, पाहा व्हिडीओ
‘या’ देशाचे राष्ट्रपती महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करायला गेले अन्…; पाहा व्हिडीओ
“आज मा.बाळासाहेब असते, तर पहिले आमंत्रण देवेंद्र फडणवीसांना दिले असते”