आमदाराने घोड्यावर चढून शिवरायांच्या पुतळ्याला हार घातला; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

मुंबई | वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 14 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचं वसमत शहरात आगमन झालं त्यावेळी राजू नवघरे यांनी भावनेच्या भरात थेत घोड्यावर चढून शिवरायांना हार घातला.

नवघरे यांच्या या कृतीमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

वसमत शहरात शिवाजी महाराज यांचा पंचधातूने बनवण्यात आलेला 14 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारला जामार आहे. 9 ऑक्टोबर रोजी जयपूरवरुन हा पुतळा वसमतच्या दिशेनं रवाना झाला होता.

बुधवारी दुपारी औंढा नागनाथ शहरात आगमन होताच नागरिकांनी मोठ्या उत्साहात पुतळ्याचं स्वागत केलं. शिवरायांचा पुतळा वसमत शहरात दाखल झाला. त्यावेळी आमदार राजू नवघरे यांनी घोड्यावर चढून शिवरायांना पुष्पहार अर्पण केला. .

नवघरे यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि शिवप्रेमींनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केलाय.

मी एकट्यानं पाप केलं असेल तर मला फाशी द्या. अनेकजण माझ्यासोबत होते. तर माझ्या एकट्यावर टीका का?, असा सवाल त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका- चित्रा वाघ

काय सांगता! एकटा कुत्रा चक्क दोन-तीन वाघांना भिडला, पाहा व्हिडीओ

“अजित पवारांच्या बहिणींच्या नावावर…”; किरीट सोमय्यांच्या नव्या आरोपांनी खळबळ

मोदी सरकारचा मोठा निर्णय, एअर इंडियानंतर ‘ही’ कंपनी देखील विकणार

मी चार वर्ष मुख्यमंत्री होतो पण…- शरद पवार