पुढील 4 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | हवामान बदलाचा परिणाम आपल्या राज्यातही होण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसासाठी अनूकुल वातावरण तयार होत आहे.

येत्या चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. परिणामी सध्या राज्यात शेतकरी आपापली काम उरकुन घेण्यावर भर देत आहेत.

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. परिणामी या पावसाचा मुक्काम वाढणार का अशी चिंता आता सर्वांना सतावत आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात पावसाचा जोर आता वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात सध्या वातावरणात बदल होताना पहायला मिळत आहेत.

कोकण किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. कोकणाच्या काही भागात आणि मुंबईसारख्या भागात पावसाचा जोर आता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलक्या सरी कोसळत आहेत. आता यांचं रूपांतर मोठ्या पावसात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर राज्यात येत्या चार दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस हजेरी लावू शकतो. राष्ट्रीय हवामान खाते वेळोवेळी नागरिकांना पावसाबाबत माहिती देत आहे.

कमी दाबाचे क्षेत्र हे किनारपट्टीपासून लांब जाऊन मोठं होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी येत्या 48 तासांपासून राज्यात ठिकठिकाणी पाऊस हजेरी लावू शकतो.

सध्या राज्यात पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग हा पावसाच्या सावटाखाली आहे. पुणे आणि मुंबईमध्ये तर काही प्रमाणात पाऊस सुद्धा पडला आहे. अशातच आता हवामान खात्याकडून अरबी समुद्रातील वातावरणाचा परिणाम राज्यावर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवामाना बदललं की राज्यात बाष्पयुक्त वारे वाहू लागतात. परिणामी राज्यात पावसाळा आणि हिवाळा दोन्हींचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 अभिनेत्री प्रिती झिंटानं दिली गूड न्यूज! वयाच्या 46व्या वर्षी बनली जुळ्या मुलांची आई

  भर सामन्यात चहर आणि गप्टीलची नजरेची खुन्नस, पाहा व्हायरल व्हिडीओ

  “संजय राऊत यांना मी माझा पगार देतो, त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं” 

  लस न घेणारे इंदुरीकरच आता सांगणार लस घ्या

  लस घेणं टाळणं महागात पडणार – अदर पुनावाला