Top news

“…म्हणून ओमिक्रॉन व्हेरिएंटला वेगाने पसरू दिलं पाहिजे”

omicron2 e1641519917886
Photo Credit - Pixabay

नवी दिल्ली | देशात आणि जगभरातच ओमिक्रॉन(Omicron) व्हेरिएंटची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. दररोज कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases) नवे रेकॉर्ड बनवत आहे. यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडत चालली आहे. अशात अमेरिकेत राहणार्‍या दोन भारतीय वंशाच्या डॉक्टरांनी कोरोनाव्हायरसच्या मध्यम ओमिक्रॉनव्हेरिएंटला वेगाने पसरू दिलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग (Spread of Omicron Variant) कमी करण्यासाठी तयार केलेल्या धोरणाचा विचार करणं आवश्यक आहे. कारण हा प्रकार अत्यंत संसर्गजन्य आहे आणि लसीद्वारे तयार केलेल्या अँटीबॉडीजवरही तो परिणाम करतो. म्हणून, जोखीम कमी करण्यासाठी धोरण निर्मात्यांनी सौम्य लक्षणांसह या प्रकाराच्या संसर्गाचा प्रसार करण्यास परवानगी दिली पाहिजे. हे थोडं अवघड असलं तरी भविष्यात अनेकांचे जीव वाचतील, असं भारतीय वंशाचे डॉक्टर विवेक रामास्वामी आणि अप्रुवा रामास्वामी यांनी म्हटलं आहे.

डॉ. विवेक रामास्वामी रोव्हेंट सायन्सेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि अप्रुवा रामास्वामी ओहायो युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरचे प्राध्यापक आहेत. या दोन्ही आरोग्य तज्ज्ञांनी जगभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत मत व्यक्त केलं आहे.

की मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम दूर केले पाहिजेत, कारण यामुळे संसर्ग पसरण्यापासून रोखता येत नसल्याचं विवेक रामास्वामी यांनी म्हटलंय.

असं करणं म्हणजे जाणूनबुजून ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार करण्यासारखं आहे आणि ही एक धोकादायक तसंच स्फोटक कल्पना आहे. त्याचबरोबर या डॉक्टरांच्या मतालाही बराच विरोध झाला आहे.

दरम्यान,देशात कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये (Corona Cases) थोडी घट झाल्याचं दिसून आलं आहे.मात्र,कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या वाढलीय.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 1 लाख 68 हजार 63 कोरोना रुग्णांची नोंद झालीय.

277 जणांचा मृत्यू (Corona Deaths)झालाय. ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून 4 हजार 461 वर पोहोचली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

“संजय राऊत यांनी सांगावं की, शरद पवार पंतप्रधान कधी होतील अन् मुख्यमंत्री…”

भाजपला मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याचा सपत्नीक काँग्रेसमध्ये प्रवेश 

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्क्यावर धक्के; आता ‘इतक्या’ आमदारांनी दिला राजीनामा 

 पर्यटनस्थळांबाबत मोठा निर्णय, फिरायला जाणार असाल तर ही बातमी नक्की वाचा

 “शरद पवारांची कुणाला अ‍ॅलर्जी असण्याचं काम नाही”