नवी दिल्ली | आयपीएलचा रणसंग्राम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाचा हा रणसंग्राम 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. सर्वच संघ आयपीएलची जोरदार तयारी करत आहेत. कोरोनामुळे बायो बबलच्या नियमांचं पालन करून प्रत्येक संघ जोरदार तयारी करत आहेत.
आयपीएल मधील प्रत्येकंच संघ सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या खेळाडूंच्या मजा मस्तीचे व्हिडीओ शेअर करत असतात. राजस्थान रॉयल्सचा संघ देखील जोरदार तयारीनिशी आयपीएलमध्ये उतरण्यास सज्ज झाला आहे. इतर संघांप्रमाणेच राजस्थान रॉयल्सचा संघ देखील आपले खेळाडुंचे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहे.
राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आता राहुल तेवतीयाचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राहुल तेवतीयाचे चाहते यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
आयपीएलचा यंदाचा हंगाम बायो बबलमध्ये खेळवण्यात येत आहे. यामुळे प्रत्येक संघ बायोबबलमध्ये राहून सराव करत आहेत. प्रत्येक खेळाडू त्यांना निर्धारित करून दिलेल्या रुममध्येच राहत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये राहुल तेवतीया देखील त्याच्या निर्धारित बेड रूममध्ये दिसत आहे. आपल्या बेडरूममध्ये असताना राहुल रूममध्ये असणारा कॅमेरा बंद करण्यास विसरतो आणि एक मजेशीर व्हिडीओ रेकॉर्ड होतो. हाच व्हिडीओ राजस्थान रॉयल्सने शेअर केला आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, राहूल त्याच्या बेडरूममध्ये फोनवर बोलत आहे. राहुल यावेळी फोनवर अनेक गोष्टी दिलखुलासपणे बोलताना दिसत आहे. सोबतच तो रूममध्ये बॅटिंगची प्रॅक्टिस करताना देखील दिसत आहे.
दरम्यान, राहुल तेवतीयाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. क्रिकेटच्या वर्तुळात सध्या याच व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
Rahul thought no one was watching. 🤭#HallaBol | #RoyalsFamily | @rahultewatia02 pic.twitter.com/kGdrbMLPvP
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 31, 2021
महत्वाच्या बातम्या –
भारतातील पक्षी जेथे आत्मह.त्या करतात त्या खोऱ्याविषयी तुम्हाला माहीत आहे का? नक्की वाचा
अभिनेत्री दिया मिर्झा होणार आई; फोटो शेअर करत दिली गुडन्यूज