हनुमान चालीसा प्रकरण! दिलासा मिळाल्यानंतरही रवी राणांची आजची रात्र तुरूंगातच

मुंबई | राज्यासह देशात सध्या फक्त भोंगे आणि हनुमान चालीसा या विषयावरून जोरदार वाद पेटला आहे. राज्याच्या राजकारणात देखील राणा दाम्पत्यांनी मोठा गोंधळ निर्माण केला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा अट्टाहास केलेल्या राणा दाम्पत्यांना मोठ्या न्यायालयीन प्रक्रियेचा सामना करावा लागत आहे.

राणा दाम्पत्यांंना विविध अटींच्या अधिन राहून जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मिळूनही राणा दाम्पत्यांसाठी आजची रात्र कठीण जाणार आहे.

राणा दाम्पत्याला मुंबईतील तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. नवनीत राणा अगोदरच तब्येतीच्या कारणानं जे. जे रूग्णालयात दाखल आहेत.

तळोजा कारागृहात असलेल्या रवी राणांना मात्र आजची रात्र न्यायालयाच्या निकालाची प्रत कारागृह अधिकाऱ्यांकडं आली नसल्यानं तुरूंगातच काढावी लागणार आहे.

तळोजा कारागृहात जमीनाची पत्र पेटी उघडण्याची वेळ 5.30 असते तोपर्यंत आलेल्या कागदपत्रांचा विचार केला जातो. पण राणा दाम्पत्याची कागदपत्र पोहचू न शकल्यानं अडचण झाली आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी विविध अटी घालत न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. या अटींचा भंग झाला तर परत एकदा राणा दाम्पत्याच्या अडचणीत भर पडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“1857 च्या युद्धात तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत मी लढलो असेल”

अडीच वर्षे तुम्ही काय केलं? पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

“भोंगेंबाज राजकारण्यांनी आज हिंदूत्त्वाचा सुद्धा गळा घोटला”

मोठी बातमी! ओबीसी आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला दणका

 जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत….- राज ठाकरे