“परदेशातून आलेल्या 30 ते 40 लाख लोकांची चाचणी तेंव्हाच केली असती तर…”

मुंबई | परदेशातून भारतात आलेल्या 30 ते 40 लाख लोकांची चाचणी केली असती आणि त्यातील आवश्यक त्यांना लॉकडाऊन केलं असतं तर आज 130 कोटी भारतीयांवर लॉकडाऊन होण्याची वेळच आली नसती, असा घणाघात समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केला आहे.

परदेशातून भारतातील विविध शहरातील विमानतळावर उतरलेल्यांची तेव्हाच खरेतर चाचणी व्हायला हवी होती. तेव्हाच जर परदेशातून आलेल्या लाखो प्रवाशांना क्वारंटाईन करून तपासले असते तर 130 कोटी भारतीयांवर आज लॉकडाऊन होण्याची वेळ आली नसती, असं अभय बंग यांनी म्हटलं आहे.

भारत सरकारने त्यांना उपलब्ध असलेल्या पर्यायातून लॉकडाऊनचा पर्याय सर्वोत्तम म्हणून निवडला असला तरी काही तज्ज्ञांच्या मते लॉकडाऊन हा काही ठोस पर्याय नाही. लॉकडाऊनमुळे खरोखर किती फायदा झाला याला ठोस आधार नाही, असं अभय बंग म्हणाले आहेत.

दरम्यान, माझ्या मते लॉकडाऊन ज्याप्रकारे जाहीर करण्यात आला ती आदर्श पद्धती निश्चितच नाही. त्याचे परिणाम आपण उत्तर प्रदेश, बिहार तसेच काल वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ बघितलं, असं बंग यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या –

-मोदी सरकार नकारात्मक आहे; शाहिद आफ्रिदीचा निशाणा

-यंदा सरासरीच्या शंभर टक्के पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज

-धक्कादायक! मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह महिलेची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या

-भारत-पाक क्रिकेट मालिका होणे शक्य नाही – सुनिल गावसकर

-“जागे व्हा आणि कामाला लागा अन्यथा वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईल”