…तर कधीही शिवबंधन सोडू शकतो; ‘या’ शिवसेना नेत्याचा इशारा

मुंबई | भाजपनंतर आता शिवसेनेतही नेत्यांच्या नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी जाहिररित्या पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याकडे पक्षाचं कुठलंही पद नाही, त्यामुळे हातातील शिवबंधनाशिवाय सोडण्यासारखं आपल्याकडे काहीही नाही, असं दीपक सावंत यांनी म्हटलं आहे.

गेल्या दीड वर्षांपासून मी पक्षाकडे काम मागतोय मात्र मला काम मिळत नाहीए. मला रिटायर्ड व्हायची इच्छा नाही, यापूर्वी मी एनजीओच्या माध्यमातून समाज कार्य करत होतो ते काम मी पुन्हा सुरु करु शकतो. पक्षाला जर माझी गरज नसेल तर पक्षानं मला मोकळं करावं, असंही दीपक सावंत यांनी म्हटलं आहे.

माझ्याकडे शिवसेना सोडण्यासारखं काहीही नाही. पक्षात मला कुठलंही पद नाही, केवळ हातावर शिवबंधन आहे, ते मी कधीही सोडू शकतो. मात्र उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतरच याबाबत निर्णय होईल, असंही सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, फडणवीस सरकारमध्ये डॉ. दीपक सावंत यांनी आरोग्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. ते शिवसेनेच्या कोटयातून मंत्री होते.

महत्वाच्या बातम्या-