“भाजपने इतका दंगा करण्याची काहीच आवश्यकता नाहीये”

मुंबई | राज्यात सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीवरुन वातावरण जोरदार पेटलं आहे. विरोधकांनी फडणवीसांच्या चौकशीचा निषेध करायला सुरुवात केली आहे.

बदल्यांबाबतचा गोपनीय अहवाल लीक झाल्याप्रकरणात आज पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांची दोन तास चौकशी केली.

चौकशीनंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीवरुन भाजप चांगलंच आक्रमक झाल्याचं दिसत आहे. भाजपच्या या आक्रमक पवित्र्यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आतापर्यंत 24 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात ज्यांचा-ज्यांचा संबंध आहे त्यांचा जबाब घेणं कायद्याने बंधनकारक आहे, असं वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजपने इतका दंगा करण्याची आवश्यकता नाहीये. देवेंद्र फडणवीसांना पाठवण्यात आलेली नोटीस आरोपी म्हणून पाठवलेली नाहीये, असंही गृहमंत्री म्हणाले.

ही एक वर्ष जुनी केस आहे. जवाबासाठी, त्यांच्याकडे असलेली माहिती जाणून घेण्यासाठी फडणवीसांना नोटीस बजावली होती.

दरम्यान, यापुढेही मी राज्य सरकारचे घोटाळे बाहेर काढणार आहे, असा इशाराही देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. त्यामुळे आता वातावरण आणखी चिघळणार असल्याचं दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “देवेंद्र फडणवीसांनी एक व्हिडीओ बॉम्ब टाकला आहे आणि दुसरा व्हिडीओ बॉम्ब येत आहे”

  “बाहेर पडलं की पाऊस अन् टिव्ही लावला की संजय राऊत”

“राष्ट्रवादीचे सर्वच नेते भ्रष्टाचाराने माखलेले, सगळे जेलमध्ये जाणार” 

“काही लोक आता जेलमध्ये सकाळच्या पत्रकार परिषदेची परवानगी मागतील” 

“नरेंद्र मोदींच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही”