मनसेचं ठरलंय! “आम्ही किंग मेकर नाही तर किंग बनणार”

मुंबई | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपापल्या क्षेत्रात कंबर कसली आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक यावेळी महत्त्वाची ठरणार आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना विरूद्ध भाजप असा थेट सामना रंगणार असल्याचं दिसतंय.

अशातच आता मनसेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप विरूद्ध दंड थोपटणार असल्याचं दिसतंय. त्यासाठी आता मनसेने जोरदार तयारी केली आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसह बैठक घेऊन कार्यकर्त्यांना आदेश दिले होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा बैठकांचा धडाका लावला आहे.

आज राज ठाकरे यांनी पक्षातील महत्त्वाचे नेते, सरचिटणीस, पदाधिकाऱ्यांसह बैठक घेतली. त्यात त्यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

महापालिका निवडणुकीत किंग मेकर बनण्याचा प्रश्नच येत नाही, आम्हीच किंग बनणार आहोत, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. आज मुंबई महापालिका सोडून इतर पुणे, नाशिक या महापालिकांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज ठाकरे आता पुन्हा सक्रिय झाल्याचं पहायला मिळाल्याने आता मनसेला महापालिका निवडणुकीत कितपत यश मिळतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“कोरोनाला हलक्यात घेऊ नका, कारण…”; भारतीयांना अत्यंत धक्कादायक इशारा जारी

कर्नाटक हिजाब प्रकरणावर हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या… 

रानू मंडल पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात, यावेळी केलं ‘हे’ मजेशीर काम 

Hyundai नं आणली सर्वात स्वस्त कार, टाटाच्या या कारचं मार्केट डाऊन होणार? 

“अहंकाराने त्यांनी गुजरातची दोन गाढवं म्हटलं होतं पण…”