“सुरुवातीच्या काळातच एवढ्या मोठ्या संकटांना तोंड देणारा मुख्यमंत्री दुसरा कोणी नसेल”

मुंबई | कोरोनाचं संकट संपायच्या आतच निसर्ग चक्रीवादळाचं संकट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर येऊन ठेपलंय. कोरोनाविरुद्ध महाराष्ट्र लढत असताना, आता आणखी एक नवं संकट समोर आलंय. त्यामुळे आपल्या सुरुवातीच्या कार्यकाळातच एवढ्या मोठ्या संकटांना मुख्यमंत्र्यांना तोंड द्यावं लागतंय, असं अभिनेता अर्षद वारसीने म्हटलं आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा मोठा धोका असून अलिबागला हे वादळ येईल. त्यामुळे पुढचे काही दिवस कुणी बाहेर पडू नये, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या याच संकटाचा सामना करण्याच्या प्रयत्नांचं मुन्नाभाई एमबीबीएसमधील सर्किट म्हणजे हर्षद वारसी याने कौतुक केलं आहे. अर्षदने या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांना सुरूवातीच्या काळातच एवढ्या मोठ्या संकटांचा सामना करावा लागला आहे, असं अर्षद वारसीने म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईसारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरात कोरोना आणि आता निसर्ग चक्रिवादळाचा सामना या मुख्यमंत्र्यांना करावा लागत आहे, असंही अर्षद म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्रीवादळात प्रशासनासोबत मदतीला उभं रहावं- शरद पवार

-‘कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’; उद्धव ठाकरेंसाठी केजरीवालांचं ट्विट

-2020 वर्ष निराशाजनक, घाबरु नका संकटाचा सामना करा- अक्षय कुमार

-पुण्यात पाचव्या टप्प्यातील सवलती जाहीर, पाहा कोणत्या गोष्टी सुरु कोणत्या बंद?

-निसर्ग परीक्षा घेतोय पण आपण ताकदीने सामना करु- उद्धव ठाकरे