‘या’ खासदारानं भर पत्रकार परिषदेत घेतला महिला आमदाराचा गालगुच्चा, पाहा व्हिडिओ

कोलकाता| पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बंगालमधला एक व्हिडीओ याच कारणाने सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदारानं भर पत्रकार परिषदेत एका महिला आमदाराच्या गालाला हात लावल्याचं दिसतंय.

भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेतील खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यात एका पत्रकार परिषदेदरम्यान तृणमूल काँग्रेसचा एक खासदार पक्षातील एका महिला आमदाराचा गाल ओढताना दिसतो आहे. यावरून भाजपने तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

लॉकेट चॅटर्जी यांनी हे नेते म्हणजे तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी असल्याचं सांगितलं आहे. तसेच टीएमसी अशाच प्रकारे महिला सक्षमीकरण करत आहे की काय? हे आहेत टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी. हे बांकुराच्या आमदाराचा गाल ओढत आहेत जी तिकीट न मिळाल्यानं नाराज होती. अरे, लाज वाटली पाहिजे, अशी टीका चॅटर्जी यांनी केली आहे.

कल्याण बॅनर्जी यांच्या या व्हिडिओवरून भाजपने तृणमूल काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. मात्र या व्हिडिओबाबत कल्याण बॅनर्जी यांनी अद्याप स्पष्टीकरण दिलं नाही.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील 294 जागांसाठी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, आठ टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. आठही टप्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यावर 2 मे रोजी मतमोजणी होईल. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या 291 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये 50 महिलांना तिकीट देण्यात आलं आहे.

अलीकडेच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही महिला सुरक्षा आणि महागाई संदर्भात कोलकाता येथे एक रॅली काढली होती. या रॅलीत त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने महिला दिसून आल्या होत्या.

 

महत्वाच्या बातम्या –

सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा आजचे दर