महाराष्ट्र मुंबई

मुंबईत ‘या’ रेल्वे स्थानकांवर आरक्षित गाड्यांसाठी तिकीट काऊंटर सुरु

मुंबई | ऑनलाईन तिकीट बुकिंगसोबतच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या निवडक रेल्वे स्थानकावरही तिकीट विक्री सुरु करण्यात आली आहे. सीएसएमटी, एलटीटी, दादर, ठाणे, चर्चगेट यासारख्या रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे.

येत्या 1 जूनपासून देशभरात 200 एक्स्प्रेस गाड्या धावणार आहेत. या गाड्यांची ऑनलाईन तिकीट बुकिंग काल सकाळी सुरु झाल्यानंतर प्रवाशांच्या अक्षरशः उड्या पडल्या. आता निवडक रेल्वे स्थानकावरही तिकीट बुकिंग सुरु करण्यात आलं आहे.

मुंबईत मर्यादित स्वरुपात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवरील आरक्षित गाड्यांचे काऊंटर सुरु झाले आहेत. सध्या ज्या विशेष राजधानी गाड्या आणि दोनशे एक्सप्रेस चालवल्या जात आहेत, फक्त त्याच गाड्यांचं आरक्षण या काऊंटरवर देण्यात येत आहे.

दरम्यान, सोशल डिस्टन्सिंग पाळून तिकीट घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला सोडण्यात येत आहे. तसेच सुरक्षारक्षकही तैनात केल्याचं पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाबाबत शासनानं काहीच न करता विरोधकांना सहकार्य करायला सांगणं चुकीचं- चंद्रकांत पाटील

-आनंदाची बातमी… पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी, पुणेकरांना दिलासा!

-अमेरिकेचा चीनला सर्वांत मोठा दणका; ट्रम्प यांची मोठी खेळी

-संकटात असणाऱ्या महाराष्ट्राला राजकीय रणांगण बनविणे हे कुठले शहाणपण?- बाळासाहेब थोरात

-राज्याला आज नाटकाची नाही तर सहकार्याची गरज आहे- रोहित पवार