लॉकडाऊनचं पालन करण्यासाठी नवरदेवाची वरात काढली थेट मक्याच्या शेतातून; पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई| संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात अद्याप कोरोना स्थिती नियंत्रणात आलेली नाही.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. अशा संकट काळात अनेक लोक पुढे येत सढळ हातानं मदत करत आहेत.

अशातच कोरोना नियमांचं आणि लॉकडाऊनचं पालन करण्यासाठी नवरदेवाची वरात थेट शेतातून काढली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये ‘मजेदार वरात’ असं लिहिलं आहे. मध्ये एक लग्न विचित्र पद्धतीनं पार पडल्याचं दिसत आहे.

बँड, बाजा वाजवणारी मंडळी शेतातीतील सरीतून पुढे चालत आहेत. तर त्या पाठीमागे वऱ्हाडी आणि नवरदेव चालताना दिसत आहे. कोरोना विषाणूचा धसका घेऊन अशापद्धतीनं वरात काढल्यामुळे हे लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की, नवरा मुलगा बँड-बाजासह मक्याच्या शेतातून येत आहे. एवढंचं नव्हे तर, त्याच्यासोबत लहान मुलं, स्त्रिया आणि अन्य लोकंही दिसत आहेत.

शिवाय वऱ्हाडी मंडळी देखील सजलेली आहे. वाजंत्रीही आपल्या धुंदीत जबरदस्त ताल पकडला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता वेगानं व्हायरल होतं आहे.

कोरोनामुळे लग्न आणि इतर समारंभासाठी परवानगी घ्यावी लागत आहे. काही लग्नांना परवानगी दिल्यानंतरही मोठ्या प्रमाणात गर्दी करून कोरोना नियमांचा फज्जा उडवला जात आहे. तर काहींनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन विवाह आणि इतर समारंभ पुढे ढकलले आहेत.

दरम्यान, सध्या वेळ कठिण आहे, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनालाही मदत केली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे हीच काळाची गरज बनली आहे. कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत असे म्हणत अनेक लोक कोरोना काळात मदत करताना दिसत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या – 

अवघ्या 24 तासात विराट-अनुष्काकडून कोरोनाग्रस्तांसाठी…

कौतुकास्पद! 9 वर्षाच्या ‘या’ चिमुकलीनं देश…

स्वामींचा धावा करत अंकिता लोखंडेनं घेतला कोरोना लसीचा पहिला…

कौतुकास्पद! …..म्हणून वृद्ध महिलेने आपल्या जीवाची…

…..म्हणून ‘हिंदुस्थानी भाऊ’ला पोलिसांनी…