पुण्यात आज 157 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले

पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात सर्वाधिक कोरोनाचे 176 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या 6698 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर 567 रुग्णांवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

176 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात 40 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले 157 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7275 झाली आहे. पुण्यातील आताची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2399 एवढी आहे. तर आतापर्यंत 361 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘आशा’ गटप्रवर्तक,अर्धवेळ स्त्री परिचरांना मिळणार प्रोत्साहनपर रक्कम, मंत्री मुश्रीफांची घोषणा

-नुकसान भरपाई देताना नागरिकांना विश्वासात घ्या; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

-संदीप क्षीरसागरांचं स्तुत्य पाऊल; शिवारात सापडलेल्या मुलीचं पालकत्व स्वीकारलं

-“राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी सार्वजनिक कार्यक्रम नको, मात्र ही एक गोष्ट करा”

-“तुम्ही कोरोनाचा आलेख खाली आणायचा सोडून अर्थव्यवस्थेचाच आणला”