धक्कादायक, पुण्यात कोरोनाने घेतले आणखी दोघांचे बळी

पुणे |  पुणे शहराच्या कोरोनाची बाधा झालेल्या दोन रुग्णांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे. यामध्ये एका ६० वर्षांच्या ज्येष्ठ महिलेचा तर ४८ वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे.

पुरुषाचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यांना करोनाची बाधा झाल्याचे अहवाल रात्री उशिरा आले होते. त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच, ६० वर्षांची महिला काही दिवसांपूर्वी डाॅ.नायडू रुग्णालयात उपचारांसाठी आली होती. तिची चाचणी घेतली असता तो अहवाल निगेटिव्ह आल्याने तिला नायडू रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आले होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने तिला काल ससूनला दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ती मयत झाली.

दरम्यान, तिचा स्वब चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल प्राप्त झाला असून तिला करोनाची लागण झाल्याचे या अहवालात निष्पन्न झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पुण्यात काल रात्रीपर्यंत 60 कोरोनाबाधित रूग्णांची संख्या होती. तर पुणे ग्रामीणमध्ये 7 संख्या आहेधनंजय मुंडे कळवा, हजार रुपये मिळवा’;

महत्वाच्या बातम्या –

-“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कौतुकास पात्र, माझा त्यांना सलाम”

-1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

-‘धनंजय मुंडे कळवा, हजार रुपये मिळवा’; सुरेश धस यांची घोषणा

-कोरोनाविरुद्ध लढणाऱ्यांना ‘येवले अमृततुल्य’तर्फे तरतरी देण्याचं काम

-“धार्मिक कार्यक्रमांसाठी घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा”