माझ्या पराभवासाठी चीन काही करू शकतं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली | अमेरिकेत कोरोनानं हैदोस घातला आहे. अमेरिकेतील मृतांचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढत असून अमेरिकेचे अध्यक्ष कोरोनाच्या प्रसारावरून सातत्यानं चीनवर टीका करत आहेत. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर आणखी खळबळजनक आरोप केला आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि माझे प्रतिस्पर्धी जोए बिडेन विजयी व्हावे अशी बीजिंगची इच्छा आहे. कारण व्यापार आणि आयात-निर्यातीसंदर्भात मी टाकलेला दबाव कमी करण्यासाठी चीन हे करत आहे. त्यामुळे आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माझा पराभव व्हावा, मी पुन्हा निवडून येऊ नये म्हणून चीन काहीही करू शकतो, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

अमेरिकेमध्ये करोनाचा प्रसार रोखण्यासाठी तातडीनं तयारी करायला हवी होती, असा आरोप होतो. पण, चीननं करोना विषाणूबद्दल जगाला लवकरात लवकर जगाला माहिती देण्याची तत्परता दाखवायला हवी होती, असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमेरिकेतील रुग्णांची संख्या 10 लाखांवर गेली असून कोरोना बळींची संख्या 58,355 इतकी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं; ऋषी कपूर यांच्या अभिनयाचा आणि स्पष्टवक्तेपणाचा मी चाहता होतो- राज ठाकरे

-भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावायची आहे, त्यासाठीच त्यांचा खटाटोप सुरू आहे- जयंत पाटील

-“…तर कोरोनाऐवजी लॉकडाऊनमुळे अधिक लोकांचा मृत्यू होईल”

-महाराष्ट्रात विरोधी पक्ष थयथयाट करून स्वत:चेच हसं करून घेतोय; सामनाच्या अग्रलेखातून टीकेचे बाण

-‘व्हाइट हाउस’ने पंतप्रधान मोदींना अचानक केलं ‘अनफॉलो’ यावर राहुल गांधी म्हणाले…