‘मी जर आता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो तर…’; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर (Russia-Ukraine) सैन्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पुतिन यांच्या या आदेशानंतर आता जगामध्ये चिंता पसरली आहे. अमेरिकेच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अमेरिका आणि रशिया या महासत्ता एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. रशियन सैन्य आता युक्रेनच्या सिमेत दाखल झाल्यानंतर आता अमेरिका आणि रशियाच्या नेत्यांमध्ये वाद रंगला आहे.

अमेरिकेच्या नेतृत्वात नाटो देशांनी पुतिन यांच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. तर पुतिन यांनी जगातील कोणत्याही देशानं आमच्या कारवाईत हस्तक्षेप करू नये, असं म्हटलं आहे. असं असताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यो बायडेन यांच्यावर टीका केली आहे.

अमेरिकेच्या कमकुवत राष्ट्राध्यक्षांमुळं जगाला सध्या युद्धाला तोंड द्यावं लागत आहे. मी जर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो तर युक्रेन आणि रशिया युद्ध झालंच नसतं, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.

व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या सैन्याला शस्त्र खाली टाकण्याचं आवाहनं केलं आहे. विनाकारण कोणीही आमच्या कारवाईत येण्याचं काम करू नये, असं पुतिन म्हणाले आहेत. परिणामी वाद वाढला आहे.

युक्रेन सरकारनं आपल्या 30 लाख नागरिकांना रशियातून बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. रशिया आता युक्रेन प्रश्नावर आक्रमक होत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. युक्रेन-रशिया संघर्ष पेटला असताना जगावर महागाईचं संकट घोंघावत आहे.

रशियन सैन्य आपल्या वेगवान हालचाली करत आहे. युक्रेनच्या सिमेवर लाखोंच्या संख्येत रशियन सैनिकांची जमवाजमव होताना दिसत आहे. रशिया आपल्या अफाट सैन्य ताकतीचं प्रदर्शन या युद्धात करणार आहे.

जगातील इतर देश मात्र सध्या आपापल्या नागरिकांना युक्रेनमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. युक्रेन प्रश्नावर जगात सर्वत्र विचारविमर्श करण्यात येत आहे. युक्रेनमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या टीकेनंतर आता अमेरिकेतील अंतर्गत राजकारण तापलं आहे. जगाला इतक्या मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागत असताना अमेरिकेत राजकीय टीका चालू आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 मराठी भाषादिनी राज ठाकरेंची मोठी घोषणा; घेतला ‘हा’ निर्णय

तुमची लाडकी Wagon R येतेय नव्या रूपात; जाणून घ्या फिचर्स 

मोठी बातमी! दिशा सालियन बदनामी प्रकरणी राणे पिता-पुत्रांना झटका 

युक्रेनने तो प्रस्ताव फेटाळला; संतापलेल्या रशियानं केली मोठी घोषणा 

‘या’ भागात येत्या काही तासात पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा इशारा