माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला इंदुरीकरच जबाबदार असतील- तृप्ती देसाई

अहमदनगर | इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केली होती. त्यासाठी त्या काल अहमदनगरला गेल्या होत्या. यावेळी त्यांनी माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला इंदुरीकरच जबाबदार राहतील, असं देसाई यांनी म्हटलं आहे.

येत्या दोन-तीन दिवसांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर आम्ही अकोले येथे त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या तोंडाला काळं फासू, असं म्हणत देसाई यांनी इंदोरीकरांवर निशाणा साधला.

तृप्ती देसाई यांची गाडी सुप्यावरून जात असताना काही वारकऱ्यांनी त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवले. आणि त्यांचा निषेध केला.

नगरमध्ये येऊ देणार नाही, असा इशारा मला दिला होता. पण प्रत्यक्षात कुणीही आडवं आलं नाही. अडवणार म्हणणारे पेड कार्यकर्ते असावेत. त्यांचा काही तरी लाभ होत असावा, त्यामुळे ते आमचा विरोध करत असल्याचं देसाई यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या- 

-“अजितदादा आपण इतकी वर्षे उगाच वेगळे राहिलो”

-“ज्यांना जागांची पन्नाशी गाठण्यासाठी पावसात भिजावं लागलं, त्यांनी भाजपला न बोललेलंच बरं”

-आम्ही शिवभक्त अन् छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे- उद्धव ठाकरे

-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांना नमन!; पंतप्रधानांनी केला खास शैलीत मुजरा

-राकेश मारियांनी 26\11 हल्ल्यासंदर्भात केला ‘हा’ मोठा खुलासा!