राज ठाकरेंच्या ‘त्या’ मागणीला तृप्ती देसाईंचा विरोध

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा, अशी मागणी केली आहे. या मागणीला सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विरोध केला आहे.

दारूच्या पैशातून महिलांचा शाप मिळणारा महसूल राज्य सरकारने लॉकडाऊन परिस्थितीत स्वीकारू नये, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

राजसाहेब…महसूल निर्माण करता येईल आणि राज्याचे अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर आणता येईल, पण महिलांचे शाप मिळणारा महसूल वाईन शॉपमधून सरकारला मिळतो. एक महिना उलटून गेला महाराष्ट्रात दारूची दुकाने बंद आहेत. राज्यातील जनता व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण अचानक वाईन शॉप सुरू केले तर घरी जे काही साठवलेले, उरलेले पैसे आहेत ते दारूवर खर्च केले जातील, असं तृप्ती देसाई यांनी सांगितलं.

दरम्यान, अनेक महिलांचा संसार उध्वस्त या दारुमुळेच झाला आहे. सरकारने दारूची दुकानं सुरू करू नये एवढीच सर्वसामान्यांच्या वतीने उद्धवजी ठाकरे यांना आमची विनंती राहील, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

-गरीब मजुरांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये भरा- सोनिया गांधी

-सुप्रिया पिळगावकर यांनी शेअर केला विशीतला फोटो, आताच्या अभिनेत्रींना लाजवेल असं सौंदर्य

-कोरोना इतक्यात जग सोडून जाणार नाही, आपल्याला आणखी भरपूर मोठा पल्ला गाठायचाय- WHO

-…म्हणून वाईन शाॅप सुरु करा – राज ठाकरे

-” रेल्वे सोडा नाहीतर अडकून पडलेले कामगार-मजूर रस्त्यावर येतील”