“कायद्याचे रक्षकच जर भक्षक व्हायला लागले तर जनतेनी न्याय कोणाकडे मागायचा?”

पुणे | अहमदनगरमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पती-पत्नींना विवस्त्र करुन अंगावर पेट्रोल टाकून अमानुष मारहाण केली. या घटनेने राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत.

अहमदगरची घटना ही महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. रक्षकच भक्षक व्हायला लागले तर जनतेनी न्याय कोणाकडे मागायचा? यामध्ये विवस्त्र करून मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

पोलिसांचाही या प्रकरणात सहभाग असेल तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? कायद्याचे रक्षकच भक्षक व्हायला लागले तर जनता विश्वास कोणावर ठेवणार? न्यायालीन प्रक्रियेत उशिर व्हायला नको. सरकारने तातडीने आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी देसाईंनी केली आहे.

आरोपींनी विवस्त्र करुन मारहाण केलेल्या दाम्पत्याचा व्हिडीओ केलाय. पोलिसांकडे तक्रार केली तर व्हिडीओ व्हायरल करु, बदनामी करु, अशी धमकीही दिली. यामध्ये पोलिसांचाही हात असल्याची माहिती पीडित दाम्पत्यांनी दिली आहे. घटनेनेनंतर आरोपींविरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. अहमदनगर तोफखाना पोलिसांनी या प्रकरणात कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला.

महत्वाच्या बातम्या-

-इंग्रजी शाळांमधील फी दरवाढीसंदर्भात बच्चू कडूंचं मोठं विधान!

-कोरोना व्हायरसचा दीपिकालाही तडाखा

-प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणारी तरूणी झाली प्रियकरासोबत पसार!

-भाजपच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांना बनवलं थेट पंतप्रधान, अन् सभागृहात पिकला हशा

तारक मेहताच मराठीचे ‘मारक’ मेहता; मनसेचं टीकास्र