पुण्यात दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू, मृतांची संख्या 31 वर

मुंबई | पुण्यात आज 12 एप्रिल दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. पुण्याचा कोरोना मृत्यूदर देशात सर्वाधिक असल्याचं दिसून येत आहे.

पुण्यातील  58 वर्षीय आणि  56 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोन्ही रुग्णांना कोरोनाशिवाय इतर आजारही जडलेले होते. पुण्यात दिवसेंदिवस कोरोना मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांबरोबर मृतांची संख्या ही राज्याच्या तुलनेत अधिक वाढत आहे. 100 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यातील मृतांचा आकडा पाहिला तर देशात सर्वाधिक मृत्यूदर पुणे जिल्ह्याचा असल्याचं दिसतंय.

पुण्यात शुक्रवारपर्यंत 209 बाधित रुग्णांपैकी 25 जणांचा मृत्यू झाला, हा आकडा महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यांपेक्षा अधिक आहे. मुंबईत मृतांची संख्या सर्वाधिक असली तरी रुग्णांची संख्या अधिक असल्याने मृत्यूदर हा सहा टक्क्याच्या जवळपास आहे.

महत्वाच्या बातम्या –

-दादा, कोरोनाचा धोका साठीच्या वरील लोकांना जास्त उद्भवतो, काळजी घ्या- जयंत पाटील

-राज्यात 134 नवे कोरोना रुग्ण; आकडा 1895 वर

-अशा वेळीही तुम्हाला राजकारण सुचतंय, याचं मला कौतुक वाटतं; जयंत पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला

-…तर भारतात आठ लाख लोकांना झाली असती कोरोनाची लागण!

-इथेही राजकारण?… पी. एम. केअरमध्ये जास्त निधी येण्यासाठी मोदींची चाल