CAA ला विरोध करणाऱ्या दोन भाजप नगराध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी!

मुंबई | परभणी जिल्ह्यातील उपनगराध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. अनुशासनाचं कारण देत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

भाजपची सत्ता असलेल्या नगरपालिकेत सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधात ठराव संमत करण्यात आला होता. तसंच तो ठराव केंद्रालाही पाठवण्यात आला.

अनुशासनाचं कारण देत पक्षानं पालम नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे आणि सेलू नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्यावर कारवाई केली आहे. दोघांना पक्षातून निष्कासित करण्यात आलं आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत घोषणा केली.

दरम्यान, भाजपची सत्ता असलेल्या परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपरिषदेत सर्वसंमतीने सुधारिक नागरिकत्व कायदा आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या अंमलबजावणीविरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आाला.

 

महत्वाच्या बातम्या- 

-“आरोग्य सुविधांवर अफाट खर्च होऊनही कुपोषणाने मुले दगावतात कशी?”

-ठाकरे सरकारने केली शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा; शंभर युनिटपर्यंत मिळणार मोफत वीज

-“राम भक्तांना धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही”

-… तर आम्ही शिवसेनेला पाठींबा देऊ- सुधीर मुनगंटीवार

-… म्हणून छत्रपती शिवरायांचा इतिहास आम्ही कल्पनेने रंगवू शकत नाही- रितेश देशमुख