कोल्हापूर महाराष्ट्र

परीक्षांबाबत लवकरच निर्णय जाहीर करणार- मंत्री उदय सामंत

रत्नागिरी | बारावी नंतरच्या सीईटी परीक्षा आणि युजीसीच्या परींक्षाबाबत मंगळवारी सर्व कुलगुरूंसोबत एक व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे, त्याचा अहवाल आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. त्यानंतर काही दिवसांत सर्वच परींक्षा बाबत निर्णय होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते रत्नागिरीत बोलत होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे दरवर्षीप्रामाणे होणाऱ्या परीक्षा देखील लांबवणीवर पडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रामाचं वातावरण आहे. मात्र लवकरच या परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल, असं मंत्री सामंत यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे विद्यापीठांच्या परीक्षांबाबतही मे अखेर निर्णय घेण्यात येणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांच्यामधलं चितेंचं वातावरण मिटणार आहे.

आजपासून सर्वांनाच घराबाहेर पडण्याची परवानगी मिळालीय अशा प्रकारे रत्नागिरीत आज सकाळपासून बाजारपेठ आणि रस्त्यावर गर्दी झाली होती. याकडे आम्ही प्रशासन गांभीर्यांने पहात आहे. त्यामुळे रत्नागिरीतील बाजारपेठेत दुचाकी बंद करण्यात आलीत आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

-तुकाराम मुंढेंनी शासनाचा आदेशही मानला नाही; दारुची दुकानं बंद म्हणजे बंदच!

-परप्रांतीय मजुरांची पोलिसांवर दगडफेक; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर

-…या दोन मराठमोळ्या मुलींनी आपल्या अदाकारीनं जिंकलं साऱ्या महाराष्ट्राचं मन

-उठवलेली दारूबंदी हे शासनाचं अतर्क्य पाऊल- डॉ. अभय बंग

-लॉकडाउनच्या नियमांचा भंग केल्याने उत्तर प्रदेश पोलिसांकडून अजब शिक्षा, म्हणाले…

IMPIMP