Top news महाराष्ट्र राजकारण सातारा

“माझ्या हातात ईडी द्या, मग दाखवतो सगळ्यांना”; उदयनराजे कडाडले

Udyanraje Bhosale 47896

सातारा | राज्यात चालू असलेल्या सध्याच्या गोंधळावर भाजप खासदार उदयनराजे यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. राजेंनी सत्ताधारी आणि विरोधक दोन्हींना निशाण्यावर घेतलं आहे.

सध्याचे राजकीय वातावरण कुणी बिघडवले याचा विचार झाला पाहीजे. माझं आवडत चॅनेल टाॅम अॅंड जेरी आहे मात्र सध्या ते बघायचं बंद केलं आहे. आणि ज्या माकड उड्या चालल्या आहेत त्या बघतो, असं राजे म्हणाले आहेत.

कोण कुणाला मारतंय, कोण कुणाला आत टाकतंय ते बघतो, मजा येते, अशा शब्दात उदयनराजेंनी निशाणा साधला आहे. उद्यनराजे यांनी सरकारच्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

पानपट्टीवर बिडी मिळते तशी अवस्था ईडीची झाली आहे. कोल्हापूरच्या सभेवरून देखील राजेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत माझ्या हातात ईडी द्या मी दाखवतो यांना, असा इशारा देखील उदयनराजेंनी दिला आहे. परिणामी वाद वाढण्याची शक्यता आहे.

लावा ना ईडी, चाप लावा, सगळे येतील, यांना दांडक्यानं सडकून काढलं पाहीजे, असंही उदयनराजे म्हणाले आहेत. फुटपाथवर झोपणाऱ्या लोकांना काही कळत नाही का?, असा सवाल देखील उदयनराजेंनी विचारला आहे.

एक-दोन वर्ष जेलमध्ये असणाऱ्या लोकांनी काही केलं नाही. तरी जेलमध्ये असणाऱ्यानं काही केल नाही म्हणायचं. लोकांना डोळे नाहीत, मेंदू नाही, लोक हसतात, असंही उदयनराजे म्हणाले आहेत.

दरम्यान, उदयनराजेंनी नाव न घेता केलेली ही टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा होती अशी चर्चा रंगली आहे. उदयनराजेंनी बऱ्याच दिवसानंतर आपल्या खास शैलीत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 PM आणि CM यांच्यातील वाकयुद्धात फडणवीसांनी उडी; ट्विट करत म्हणाले…

सोमय्यांची जखम खरी की खोटी?, डाॅक्टरांचा अहवाल आला अन् स्पष्टच झालं…

 “…तर सोमय्यांची हत्याच झाली असती”; भाजप नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

 अनिल देशमुखांची जेलमधून सुटका होणार?; महत्त्वाची माहिती समोर

रक्त की टोमॅटो सॉस?; सोमय्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर