याला म्हणतात बडे दिलवाला..; उदयनराजेंनी नव्या महाराष्ट्र केसरीची थोपटली पाठ!

सातारा | पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये पार पडलेल्या चुरशीच्या लढतीत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर  महाराष्ट्र केसरी किताबाचा विजेता ठरला आहे. त्याने लातूरच्या शैलेश शेळके याचा पराभव केला. कुस्ती झाल्यानंतर हर्षवर्धनने शैलेशला आपल्या खांद्यावर घेऊन आखाड्याची फेरी मारली. त्याच्या या खिलाडूवृत्तीचं सगळीकडे कौतुक होत आहे. यावर भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी ट्विट केलं आहे.

हे असं फक्त महाराष्ट्राच्या भूमीतच पाहायला मिळतं…विजयी मल्ल पराभूत मल्लाला खांद्यावर घेऊन आखाड्यात मिरवतो, याच खिलाडूवृत्तीला बडे दिलवाला म्हणतात !, असं टविट करत उदयनराजेंनी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धनचं आपल्या खास शैलीत कौतुक केलं आहे.

विजयी पैलवान महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान शैलेश शेळके यांचे खूप खूप अभिनंदन, असंही ट्विटमध्ये म्हटलं आहे. या चुरशीच्या लढतीत 3-2 अशा फरकाने हर्षवर्धन सदगीरनं बाजी मारली.

दरम्यान, ‘कुस्ती तिथं कुस्ती आणि नंतर आपली जिवाभावाची दोस्ती’ याचा प्रत्यय हर्षवर्धनने दाखवून दिला आहे. हर्षवर्धन आणि शैलेश हे दोघेही काका पवार यांच्याच तालमीतील मल्ल आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-