पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची पुण्यात भेट घेतली. उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उदयनराजे शरद पवारांना भेटल्याचं कळतंय.
शरद पवारांनी उदयनराजेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे. त्यावरुन उदयनराजे भोसलेंच्या भाजपमध्ये जाणार नसून राष्ट्रवादीतच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यात झालेल्या बैठकीला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेही उपस्थित होते.
उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. आजच्या बैठकीत निवडणुकीच्या प्रचाराचे मुद्दे आणि रणनितीवर चर्चा झाली. उदयनराजेंना कोणतीही नाराजी नाही. ते राष्ट्रवादीतच राहणार आहेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याचं कधीच बोलले नाहीत, असं धनंजय मुंडेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
उदयनराजेंचा भाजप प्रवेश हा गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय आहे. त्यावरुन अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपने आपल्याविरुद्ध टोकाचा प्रचार करत निवडणुकीत पराजय होईल अशी व्यूहरचना करत प्रचार केला होता. उदयनराजेंनीही भाजप प्रवेशाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली असून ते राष्ट्रवादीतच राहतील, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
हर्षवर्धन पाटील यांचे पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्याबद्दल मोठे खुलासे! https://t.co/Y5CXuUwrV1 @Harshvardhanji @AshokChavanINC @prithvrj
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019
अजित पवारांचं माझ्यावर फारच प्रेम आहे- हर्षवर्धन पाटील https://t.co/JlMo04wtp9 @Harshvardhanji @AjitPawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019
‘या’ ज्येष्ठ नेत्याचा मुलगा ‘क्रांतिकारी’च्या माध्यमातून अपक्ष लढणार- https://t.co/Ql8lJHsMS7 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019