आमची छाती जरी फाडली तरी रामच दिसेल- चंद्रकांत पाटील

नवी दिल्ली |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज ते रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. उत्तर प्रदेश सरकारने त्यांना गार्ड ऑफ ऑनरचा मान दिला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर टोला लगावला आहे.

शिवसेनेला रामाचं आणि त्यांचं नातं दाखवावं लागतं मात्र आमची छाती जरी फाडली तरी आमच्या छातीत राम दिसतो, असा खोचक टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तसंच काँग्रेस नेतेही अयोध्येत प्रभू रामाचं दर्शन घ्यायला आले आहेत, हे याची देही याची डोळा आम्हाला बघायला भेटल्याचं समाधान आहे, असं ते म्हणाले.

संपूर्ण जग आणि संपूर्ण हिंदू समाज उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याकडे लक्ष ठेवून आहे. उद्धवजी जसे आज आलेत तसे यापूर्वीही आले होते आणि या पुढेही येत राहतील. आमची रामावर श्रद्धा आहे यामध्ये राजकारण कुठं येत, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. तर राजकारण करण्याचा प्रश्न नाही. आम्ही रामाच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या जोरावर सत्तेत आलो आहोत. सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. त्याचं औचित्य साधत आम्ही आणि उद्धवजी रामाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत, असं मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काँग्रेस नेते आणि मंत्री सुनिल केदार देखील अयोध्येत पोहचले आहेत. यातून अयोध्या विषयावर आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही, असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय. तर रामाचं मंदिर उभारण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न असेल आणि पाठिंबा देखील असेल, असं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-राज्यसभेसाठी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चुरस

-काय आश्चर्य ना… येस बँकेवर निर्बंध येण्या आधी गुजरातच्या बँकेने काढून घेतले 265 कोटी

-“भारतात मुस्लिमांच्या जीवाला धोका”

-…म्हणून आम्ही बाबरी पाडल्याची जबाबदारी घेतली; संजय राऊतांचा खुलासा

-निर्भयाच्या आरोपींना भरचौकात फाशी देण्यात यावी- अमृता फडणवीस