“मुंबईचा लचका तोडणाऱ्यांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही”

मुंबई | मुंबई ही मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला तर तुकडे केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला आहे.

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

संघ एकदाही भारताच्या स्वातंत्र लढ्यात नव्हता, कुठे होता संघ लढ्यावेळी? स्वातंत्र्य लढ्यात संघाचं योगदान नाही. संयुक्त लढ्याच्या लढाईतून पहिलं कोण फुटलं तर यांचे बाप म्हणजे संघ. तेव्हा पासून मुंबईचा लचका तोडण्याचं काम सुरु आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बऱ्याच दिवसानी मैदानात उतरलो आहे. ज्यांना महाराष्ट्र म्हणजे काय आहे हे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी बोलाव लागत आहे. भाजपसोबत होतो तेव्हा आमचं हिंदुत्व गधाधारी होते. आता आम्ही त्या गाढवांना सोडलंय, अशी टीका त्यांनी भाजप तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्य– 

“काही गाढवं आमच्या सोबत होती, त्यांनी लाथ मारण्याआधी आम्हीच त्यांना मारली” 

“आजची सभा सांगते मुंबईचा बाप फक्त शिवसेनाच” 

मोठी बातमी! केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात 

“तिला वेळेवर आवर घालायला हवं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही” 

शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…