मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थावर उद्या आपल्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या अभूतपुर्व शपधविधी सोहळ्याला उद्धव ठाकरेंनी जवळपास 400 शेतकऱ्यांना निमंत्रण दिलं असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

राज्यभरात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या शेकडो कुटुंबीयांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. शेतकऱ्यांचा मान राखत हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवतीर्थावर होणाऱ्या शपथविधीसाठी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही आमंत्रण देण्यात आलं असल्याचं, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी सांगितंलं आहे. सोनिया गांधी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

उद्या संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा होणार आहे. याआधी 1 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा होणार असल्याचं बोललं जात होतंं. मात्र सर्व पक्षांचे आमदार मुंबईत असून त्यांना लवकरात लवकर आपल्या मतदारसंघात जावून काम करता यावीत यासाठी शपथविधी सोहळा गुरुवारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समजत आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-