…तर तो शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान आहे- उद्धव ठाकरे

मुंबई | महाराष्ट्रात जे घडवलं जातंय त्याला ‘नाट्य’ वगैरे म्हणणं म्हणजे रंगभूमीचा अपमान आहे. हातात सत्ता आहे, तपास यंत्रणा आहेत, भरपूर काळा पैसा आहे, त्या जोरावर राजकारणात हवा तो उन्माद घडवू शकतो असे कुणाला वाटत असेल तर शिवरायांच्या महाराष्ट्राचा तो अपमान आहे, अशी खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’मधून त्यांनी भाजपसोबतच अजित पवारांवरही टीकेचे बाण सोडले आहेत.

अजित पवारांच्या रूपाने त्यांनी एक टोणगा गोठ्यात आणून बांधलाय आणि टोणग्याचे दूध काढण्यासाठी ‘ऑपरेशन कमळ’ योजना आखली आहे. हेच लोक एरवी सत्ता हे साध्य वगैरे नाही अशी प्रवचने झोडत नैतिकतेचा आव आणतात. मग आता तुमच्याकडे बहुमत आहे, ते पाहूनच राज्यपालांनी शपथ दिली आहे असे तुम्ही म्हणत आहात ना? तर मग ही ‘ऑपरेशन कमळ’ची भामटेगिरी कशासाठी?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला आहे.

आज राज्यात सर्वत्र भाजपची छी-थू होत आहे. टोणग्याचे शेण भाजपच्या स्वच्छ, पारदर्शक वगैरे चेहऱ्यावर उडाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील अस्वस्थ झाले असावेत. राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार हे पंचवीस-तीस आमदार घेऊन भाजपच्या गोठ्यात येतील या भ्रमात फडणवीस व त्यांचे मंडळ होते. अजित पवार यांचे कथित बंड वाळूवर गाढवाने मुतावे व थोडी फसफस व्हावी तसे फसले आहे.

दरम्यान,भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी तत्त्व, नीतिमत्ता वगैरे गुंडाळून ठेवलीय. सत्तेसाठी कोणत्याही थराला त्यांची जाण्याची तयारी आहे. पण काहीही झालं तरी त्यांना विधानसभेत बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, असा विश्वास त्यांंनी व्यक्त केलाय.

 

महत्वाच्या बातम्या-