अत्याचारग्रस्त कुटुंबातील मुलाच्या शिक्षणाची रूपाली चाकणकरांनी उचलली जबाबदारी!

औरंगाबाद |  औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव इथल्या अत्याचारग्रस्त पिडीत कुटुंबातील मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उचलली आहे. त्यांनी दाखवलेल्या माणुसकीने इतरांपुढे एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.

नववीत शिकणाऱ्या नितीन अनिल वाघ या मुलाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी चाकणकर यांनी उचलली आहे. ट्वीटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. चाकणकरांनी घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांचं कौतुक होताना दिसून येत आहे.

समाजाला आपण काहीतरी देणेकरी लागतो या भावनेने मी हा छोटासा प्रयत्न केल्याची भावना चाकणकर यांनी यानंतर व्यक्त केली आहे. अन्यायग्रस्त आई व बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने शासनस्तरावर प्रयत्न करेल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली आहे.

दरम्यान, माझ्या शिक्षणाची जबाबदारी ताईंनी घेतल्याने त्यांचे मनापासून आभार, अशा भावना नितीने व्यक्त केल्या आहेत.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-“संभाजी महाराजांना स्त्रियांचा अन् दारुचा व्यसनी म्हणणाऱ्या गोळवळकरांचा चंद्रकांतदादा निषेध करणार का?”

-जुन्या गड्यावर, नवी जबाबदारी; हर्षवर्धन जाधवांना राज ठाकरेंकडून बक्षिस!

-“हिंदुत्ववादी शिवसेनेचा मुस्लिम आरक्षणाचा विचार दुर्भाग्यपूर्ण”

-पवारांना रामराम ठोकत हाती भगवा घेतलेल्या सचिन अहिरांवर सेनेने सोपवली मोठी जबाबदारी!

-जखम टोंगळ्याला अन् पट्टी मस्तकाला; कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर