उन्नाव बलात्कार पीडितेला एम्स रूग्णालयामधून दिला डिस्चार्ज

नवी दिल्ली | उन्नाव बलात्कार पीडितेला एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता ती आपल्या कुटुंबीयांसोबत दिल्लीत राहणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर एम्स रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. आता तिला डिस्चार्ज मिळाला आहे.

काही दिवसांपुर्वी पीडिता आपल्या कुटुंबीयांसोबत कारने जात असताना तिच्या कारला ट्रकने धडक दिली त्याच्यात तिच्या नातेवाईकाचा मृत्यु झाला होता. पीडिता आणि तिचे वकिल गंभीर जखमी झाले होते.

अपघातानंतर तिला दिल्लीला उपचारांसाठी हलवण्यात यावं अशी मागणी महिला आयोगाने केली होती. त्यानंतर तीला तातडीने दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं.

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंग सेंगरनेच ही घटना घडवून आणली असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी या अपघातानंतर केला होता.

महत्वाच्या बातम्या-