‘…तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही’; राकेश टिकैत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली | गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालं आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आज देशातील जनतेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी ही मोठी घोषणा केली.

पंतप्रधान मोदींनी केलेल्या या मोठ्या घोषणेचे अनेक प्रतिसाद उमटताना दिसत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज अखेर मोठं यश मिळालं आहे.

नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचं आवाहन केलं आहे.

मोदींनी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयायवर आता शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते आणि भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राकेश टिकैत यांनी सोशल मीडियावर ट्विट करत मोदींच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. टिकैत यांनी यांनी ट्विट करत म्हटलं की, आंदोलन तात्काळ माघारी घेतलं जाणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत, ज्या दिवशी संसदेत कृषी कायदे रद्द केले जातील.

पुढे राकेश टिकैत यांनी म्हटलं की, सरकार MSP सह शेतकऱ्यांच्या अन्य मुद्द्यांवर देखील चर्चा करेल. मोदींच्या या निर्णयांचं काहीजण कौतुक करताना दिसत आहेत तर काहीजण कायदे मागे घ्यायला इतका उशीर का केला, असा सवालही उपस्थित करत आहेत.

आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी पूर्ण ताकतीनं, समर्पण भावनेनं हे कायदे आणले आहे. इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही.

दरम्यान, शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागतो, असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  “आम्हीच कमी पडलो, कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच”

  मोदी सरकार अखेर झुकलं, केंद्र सरकार तीन कृषी कायदे रद्द करणार, नरेंद्र मोदींची घोषणा

  पुणेकरांना दुसरा झटका! रिक्षा दरवाढीनंतर आता सीएनजीही महागला

  “सत्तेवर येण्यासाठी पवार साहेब पावसात भिजले, पण त्यांना एसटी कर्मचारी पावसात भिजलेले दिसले नाही”

  “मला आता रडू येतंय, मी वेगवेगळ्या पातळ्यांवर लढतोय”