वामिकाचा व्हिडीओ व्हायरल अन् विराट कोहली भडकला, म्हणाला…

मुंबई | केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण अफ्रिकाच्या संघामध्ये शेवटचा सामना एकदिवसीय सामना खेळला जात आहे. यावेळी अनुष्काने मुलगी वामिकाला कडेवर घेत चिअर्स करतानाचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला.

आजपर्यंत वामिकाचा चेहरा कोणी पाहिलेला नाही. पहिल्यांदा ती अशी कॅमेऱ्यासमोर आली होती. त्यामुळे कोहली आणि अनुष्काने तिचा चेहरा समोर आणण्याचा निर्णय घेतला, असं सर्वांन वाटत होतं.

अशातच विराट कोहलीने चाहत्यांना आणि प्रसारमाध्यमांना विमिकाचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करू नये, अशी विनंती केली आहे.

ब्रॉडकास्टरचा काही सेकंदांचा व्हिडिओ चाहत्यांनी कॅप्चर केला होता आणि वामिकाचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावरून कोहली भडकल्याचं दिसतंय.

विराट कोहलीने सोमवारी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये चाहत्यांना आणि मीडियाला रविवारी काढलेले वामिकाचे फोटो आणि व्हिडिओ पसरवू नका अशी विनंती केली आहे.

आम्‍हाला सर्वांना कळवायचे आहे की, आम्‍हाला सावधगिरीने पकडलं आहे आणि कॅमेरा आमच्यावर आहे याची आम्हाला कल्पना नव्हती, असं विराट म्हणाला आहे.

याबाबत आमची भूमिका आणि विनंती एकच आहे. आम्‍ही पूर्वी सांगितलेल्‍या कारणांमुळे वामिकाच्या फोटो प्रसिद्ध न केल्‍यास आम्‍ही खरंच कौतुक करू, असं कोहली म्हणाला आहे.

दरम्यान, काल झालेल्या शेवटच्या वनडे सामन्यात विराटने हाफ सेन्च्युरी पुर्ण केली. त्यावेळी सेलिब्रेशन करताना वामिकाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

पाहा पोस्ट-

vk

महत्त्वाच्या बातम्या – 

ठरलं तर! आयपीएलच्या नव्या लखनऊ संघाचं नाव जाहीर

 “बाळासाहेब ठाकरे युतीतून बाहेर पडणार होते”; नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

पुढील 2 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ भागात थंडीच्या लाटेची शक्यता

देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले “युतीमध्ये असताना…”

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण