“गेल्या 27 वर्षांपासून मी…”, पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरे भावूक

पुणे | मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मोठ्या उत्साहात गुढीपाडवा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर घेतला. यावेळी ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं होतं.

राज ठाकरेंनी मशिदींवरील अजानचा भोंगा बंद करण्याची मागणी केली. भोंग्यांच्या समोरच हनूमान चालीसा लावण्याचा आदेश मनसेसैनिकांना दिला होता.

राज्यभरातील काही कार्यकर्त्यांनी ठाकरेंचा आदेश पाळला पण खरा गोंधळ तर पुण्यात झाला. मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरेंनी राज ठाकरेंचा आदेश मानण्यास नकार दिला. परिणामी मोठा राजकीय गोंधळ झाला आहे.

वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या आदेशावर नाराजी दर्शवल्यानंतर आता त्यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर मोरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

साईनाथ शहराध्यक्ष झाल्यामुळं माझी काहीच हरकत नाही. पुण्यात मनसे वाढावी हीच माझी ईच्छा आहे. साहेब देतील तो आदेश त्याच्याशी एकनिष्ठ राहायचं, असंं मोरे म्हणाले आहेत.

माझ्या मनात मनसे सोडण्याचा कसलाही विचार नाही. सर्वपक्षीय लोक मला भेटतात. गेल्या 27 वर्षांपासून मी राज ठाकरेंसोबत आहे, असंही मोरे म्हणाले आहेत.

माझं शहराध्यक्षपद गेलं तरी माझं महाराष्ट्र सैनिक पद कायम आहे, असं मोरे म्हणाले आहेत. मला सर्व नेत्यांचे फोन आले, गेल्या दोन दिवसात मला कळालं की एका सामान्य कार्यकर्त्याची ताकत काय आहे, असं मोरे म्हणाले आहेत.

दरम्यान, मी एकमेव नगरसेवक आहे जो गेल्या 15 वर्षांपासून पक्षाच्या तिकीटावर निवडून येतोय. माझा प्रभाग शांत राहावा म्हणून मी वेगळी भूमिका घेतली होती, असंही मोरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 मोठी बातमी ! वसंत मोरेंना मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन हटवलं

“तुम्ही काय Xपटलं, तुम्ही काय कापलं सांगा?” 

“सोमय्यांची वकिली करण्यापेक्षा फडणवीसांनी त्यांना चार जोडे हाणावेत” 

“देशाच्या स्वातंत्र्यांचा नवा लढा सुरू, आम्ही बलिदान द्यायला तयार”