एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटली! विधानसभेच्या तोंडावर काडीमोड

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटली आहे. एमआयएमने स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं जोरदार वारं वाहू लागलंय. जागावाटपाच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अशीच फेरी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात सुरू होती. मात्र जागावाटपाच्या मुद्द्यावरून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत उभी फुट पडली आहे.

प्रकाश आंबेडकरांनी आठपेक्षा अधिक जागा देण्यास नकार दिल्याने एमआयएमने स्वतंत्र विधानसभा लढणार असल्याची घोषणा केली आहे.

लोकसभा निवडणुकीत एमआयएमने पदार्पणातच जबरदस्त कामगिरी करत राज्यात वंचित बहुजन आघाडीचा इम्पॅक्ट दाखवला होता. वंचितमुळे आघाडीला मात्र मोठा फटका बसला होता. मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झालं होतं. ही युती आता तुटल्याने राज्याच्या राजकारणावर आता मोठे परिणाम होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, आमची लढाई ही काँग्रेस राष्ट्रवादीशी नाही तर आमची लढाई वंचित बहुजन आघाडीशी आहे. पुढचा विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचा असेल, असं भाकित मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. मात्र निवडणुकीपूर्वीच एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी काडीमोड झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-