जमावबंदीचे आदेश झुगारुन वाहनांच्या रांगा; यांना नक्की जायचंय तरी कुठं???

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात जमावबंदीचे आदेश दिले आहे. मात्र हे आदेश झुगारुन अनेक नागरिक घराबाहेर पडल्याचं पाहायला मिळत आहे. मुलुंडमधील आनंद नगर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात चार चाकी गाड्यांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

मुलुंडमधील आनंद टोल नाक्यावर आज सकाळच्या सुमारास प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. या टोलनाक्यावर चार चाकी वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. यात अनेक वाहन ही खाजगी असून हे सर्व नागरिक कामासाठी घराबाहेर पडले आहे.

मुंबई पोलिसांनी सजग राहत जे लोक अत्यावश्यक सेवेचा भाग आहेत, त्यांनाच मुंबईच्या दिशेने सोडत आहेत. तर इतर गाड्यांना परत माघारी पाठवत आहे.

दरम्यान, मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर बाहेरच्या राज्यातून कामानिमित्ताने आलेल्या तरुणांची गर्दी पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणेकरांना आता वाहनेही बाहेर काढता येणार नाहीत, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

-दहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक; रक्तदान करण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

-“आई दवाखान्यात असताना महाराष्ट्राचा लढवय्या लेक कोरोनाच्या विरोधात लढत आहे”

-कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये मदतीसाठी सरसावले ‘हे’ उद्योगपती

-वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी जिओचा खास प्लॅन लाँच; मिळणार तब्बल 102 जीबी डेटा