राधाकृष्ण विखे लवकरच महाविकास आघाडीत; राष्ट्रवादीच्या या बड्या मंत्र्याचा दावा

अहमदनगर | भाजप नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नाईलाजास्तव भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे ते लवकरच महाविकास आघाडीत आल्याचं दिसतील, असं मोठं वक्तव्य नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहेत.

नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी भाजपचे खासदार सुजय विखे हेही उपस्थिती होते. मुश्रीफांच्या वक्तव्यावर सुजय यांनी केवळ स्मीतहास्य केलं.

मुश्रीफ यांनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना आपलं सरकार येईल याची खात्री होती. मात्र, तसं न झाल्याने त्यांनी महाविकास आघाडीवर टीका सुरु केली आहे, असं ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार पडणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-जाने कहाँ गये वो दिन… बरोबर 2 वर्षांपूर्वी पुण्यात रंगली होती राज ठाकरे-शरद पवार मुलाखत!

-उद्धव ठाकरेंच्या’ दिल्लीवारी’वर मनसेची बोचरी टीका; म्हणाले ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’!

-गद्दारांना पक्षात स्थान नाही म्हणत राज ठाकरेंनी या नेत्याला पक्षातून हाकललं!

-शरद पवारांच्या ‘मशीदी’संदर्भातल्या वक्तव्याने समाजात तेढ निर्माण होईल- विश्व हिंदू परिषद

-मोदींना भेटल्यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली CAA, NRC आणि NPR बाबतची भूमिका!