“काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावामुळे उद्धव ठाकरे प्रकल्प रद्द करतात”

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने जुन्या विकास कामांना रद्द करणं चुकीचं आहे. लोकांच्या खेड्यापाड्याच्या विकासाला कात्री लावणंही चकीचं आहे, असं शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं म्हणणं आहे.  मेटेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दबावामुळे प्रकल्प थांबवले आहेत, असा आरोपही मेटेंनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारने मेट्रो कारशेडसारखे प्रकल्प रद्द केले. त्याबाबत आपणही सरकारमध्ये होतो हे लक्षात घ्यावं, असा टोला विनायक मेटेंना ठाकरेंनी लगावला आहे.

शिवाजी महाराजांना विरोध करणाऱ्या औलादी महाराष्ट्रात जन्मल्या. त्यांनी शिवस्मारकाला विरोध केला. सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयात लवकर भूमिका मांडावी, असंही मेटे म्हणाले आहेत.

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून मला काही अपेक्षित नाही पण उद्धव ठाकरेंनी पुढाकार घ्यावा. काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन स्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. आता सरकारने स्मारकाच्या कामाची चौकशी करुन प्रश्न मार्गी लावावा, असंही मेटे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-