आम्ही काय हातात बांगड्या नाही घातल्या- अजित पवार

अहमदनगर : मी आरे ला कारे म्हणणारा माणूस आहे. हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. जर कोणी दम दिला तर त्याला आणि त्याच्या खानदानाला बघतो, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचा नाव न घेता समाचार घेतला.

अहमदनगरमधील जामखेड तालुक्यात खर्डा येथे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते.

काही जण मला सांगतात कर्जत जामखेडच्या परिसरात काही गटामध्ये काही दबाव आहे, काही दहशत आहे. जे अशा प्रकारची दादागिरी, गुंडगिरी करतील, आम्ही काय बांगड्या घातल्या नाहीत, अशा शब्दात अजित पवार यांनी इशारा दिला. कर्जत जामखेड मतदारसंघात अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार विरुद्ध भाजप मंत्री राम शिंदे असा रंगतदार सामना आहे.

आमच्या कार्यकर्त्यांच्या केसाला कोणी धक्का लावला, तर त्यांच्याकडे बघून घेईन. मी लोकशाही मानणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान मानणारा आहे. मी घटना-कायदा मानणारा आहे. आमचे कार्यकर्ते जर नीट आचारसंहितेचं पालन करत असतील आणि कोण बाहेरचे आणले, तर मलाही जशास तसं उत्तर देता येतं, असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं. 

दरम्यान, कर्जत जामखेड मतदारसंघात अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार विरुद्ध भाजप मंत्री राम शिंदे असा रंगतदार सामना रंगणार आहे.

महत्वाच्या बातम्या-