“आम्हीच कमी पडलो, कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच”

नवी दिल्ली | गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या जनतेला संबोधित करताना कृषी कायदे मागे घेणार असल्याचं जाहीर केलं.

देशाला संबोधित करताना मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची माहिती दिली आहे. मोदींच्या या मोठ्या घोषणेनंतर बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू फूललं आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अखेर आता मोठं यश मिळालं आहे.

मोदींच्या घोषणेनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक काळ न ठेवता आता कृषी कायद्यातील बदलाचे कायदेच सरकार माघार घेणार आहे.

देशात छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हे कायदे तयार केले होते. आम्हीच कमी पडलो, कृषी कायदे हे शेतकऱ्याच्या हिताचेच होते, असंही मोदींनी यावेळी म्हटलं.

शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी पूर्ण ताकतीनं, समर्पण भावनेनं हे कायदे आणला आहे. इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही.

दरम्यान, या महिन्याअखेरीस सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संवैधानिक प्रक्रिया सुरू केली जाईल, असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मोदी सरकार अखेर झुकलं, केंद्र सरकार तीन कृषी कायदे रद्द करणार, नरेंद्र मोदींची घोषणा

  पुणेकरांना दुसरा झटका! रिक्षा दरवाढीनंतर आता सीएनजीही महागला

  “सत्तेवर येण्यासाठी पवार साहेब पावसात भिजले, पण त्यांना एसटी कर्मचारी पावसात भिजलेले दिसले नाही”

  “मला आता रडू येतंय, मी वेगवेगळ्या पातळ्यांवर लढतोय”

मोठी बातमी! एसटी महामंडळाचं खासगीकरण होण्याची शक्यता