काय सांगता! चक्क कुत्राही थिरकतोय त्याच्या आवडीच्या गाण्यावर, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | प्रत्येकाला कोणत्याना-कोणत्या गाण्यावर नाचायला आवडतं. काहींना लोकांसमोर आवडतं, तर काहींना एकट्यात असताना. काहीतर डान्सचे दिवानेच असतात. त्यांना कोणतही गाण लागलं की, त्यांचं शरिर आपोआप त्या गाण्यानूसार थिरकायला लागतं.

अशातच सोशल मीडियावर याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. परंतू या पूर्वी तुम्ही कधी एका गाण्यावर किंवा एखाण्या म्यूझिकवर एका कुत्र्याला नाचताना पाहिलं आहे का?. नसेल पाहिलं तर आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता.

या व्हिडीओमध्ये काही माणसं एका मंदीरासमोर उभी राहून हात जोडून कोणतातरी मंत्र म्हणत आहेत. ते ज्या पद्धतीने मंत्र म्हणत आहेत, त्यावरून असं वाटतं आहे की ती माणस त्या मंदीरातील पुजारी असावेत.

ते ज्यावेळी मंत्र म्हणत आहेत. त्यावेळी त्यांच्यामागे एक कुत्रा जमिनीवर आपलं संपूर्ण अंग टाकून लोळत असल्याचं दिसून येते आहे. ती माणस जसा-जसा मंत्र म्हणत आहेत, तसा-तसा तो कुत्रा आपल्या शरिराच्या हालचालीही बदलत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, कुत्रा ज्या पद्धतीने लोळत आहे ते पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्याच्यावर मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत.

तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला आतापर्यंत जवळजवळ दोन लाख लोकांनी पाहिलं आहे.

https://twitter.com/humorandanimals/status/1440019577279328257?s=20&fbclid=IwAR1S79RjkH8EKLwDc6_Z2-ES1Doztt5afdWTK2E8VhvNNw8w-2lCn6qaW7I

महत्वाच्या बातम्या-

शायनिंग करत स्केटबोर्ड चालवायला गेला अन्…, पाहा मजेशीर व्हिडीओ

काय सांगता! दुचाकीवर तब्बल 13 जाणांनी केला प्रवास, पाहा व्हायरल व्हिडीओ

बॅट्समननी असा बॉल मारला की तो डायरेक्ट टीव्हीतून आला बाहेर, पाहा अनोखा व्हिडीओ

कुत्र्याशी पंगा घेण तरूणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ

चक्क कुत्र्याची आणि घोड्याची जमली मैत्री, पाहा व्हिडीओ