महाराष्ट्रासाठी जे जरूरी होतं तेच झालं -अमृता फडणवीस

मुंबई | बहुमतापेक्षा जास्त मतं मिळवत भाजप व शिंदे गटाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. बहुमत चाचणीनंतर शिंदे सरकार आता अधिकृतपणे सत्तेत आलं आहे.

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर 10 दिवसांच्या राजकीय नाट्यावर पडदा पडला. तर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपुरात जात आहेत.

नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आले असून फडणवीसांच्या घराला देखील फुलांची सजावट करण्यात आली आहे.

नागपुरला जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राला आता सुगीचे दिवस येतील, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.

महाराष्ट्रासाठी जे जरूरी होतं तेच झालं. मला महाराष्ट्रासाठी आणि सामान्य माणसासाठी, शेतकऱ्यासाठी छान वाटत आहे, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.

नागपुरमध्ये फडणवीसांच्या स्वागतासाठी मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. यावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यात उत्साह आहे पण त्यापेक्षा जास्त जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे मी सर्वांचं स्वागत स्विकारणार आणि कामाला लागणार, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मी उपमुख्यमंत्री झाल्याने कोणाचीच नाराजी नाही. सर्वांना समजतं की त्याग करावा लागतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रशिया-युक्रेन युद्धाबाबत पुतिन यांच्याकडून अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा, शिवसेनेच्या गोटात खळबळ

बाळासाहेबांच्या प्रेमापोटी शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंना दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय

राज्यासाठी पुढचे पाच दिवस महत्त्वाचे, ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

“आम्हाला डुक्कर म्हणता आणि आमच्याच मतांवर खासदार म्हणून निवडून जाता”