कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपनं भारतात केला मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली | सध्या देशभरात 21 दिवसांचं लॉकडाउन घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांचा पवार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कालावधीमध्ये व्हॉट्सअॅपच्या वापरामध्ये या दिवसात मोठी वाढ झाली आहे. अनेक युझर्स करोना व्हायरसशी निगडीत व्हिडीओ आणि माहिती शेअर करताना दिसत आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅपनं भारतात बदल केला आहे.

आता युझर्सना व्हॉट्सअॅप स्टेटसवर मोठे व्हिडीओ अपलोड करता येणार नाहीत. व्हॉट्सअॅपनं आता व्हिडीओ शेअर करण्यासाठी एक टाईम लिमिट निश्चित केलं आहे. त्यामुळे आता युझर्सना 15 सेकंटापेक्षा अधिक व्हिडीओ आपल्या स्टेटसवर अपलोड करता येणार नाही.

व्हॉट्सअॅपशी निगडीत माहिती देणारी वेबसाईट WABetaInfo यांनी ही माहिती दिली आहे. सर्व्हरवरील लोड आणि ट्रॅफिक कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, व्हॉट्सअॅपवर याआधी स्टेटस ठेवण्याची मर्यादा 30 सेकंदांची होती. आता व्हॉट्सअॅपनं ती अर्ध्यावर आणली आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

-‘आपण सर्व एकत्र येऊन हे संकट परतवून लावू’; चीनी मोबाईल कंपनीकडून केंद्र सरकारला मदत

-“आमच्या प्रशासनाने मृतांची संख्या 10 लाखांपर्यंत आटोक्यात आणली तर ते खूप चांगलं काम असेल”

-कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही आला पॉझिटीव्ह

-पार्थ पवार फाऊंडेशनकडून पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये गरजूंना मोफत अन्न वाटप

-…तर अजुन कठोरात कठोर निर्णय घेऊ- मुख्यमंत्री