मुंबई | जगप्रसिद्ध असलेलं Whatsapp हे मेसेजिंग अॅप लवकरच नवे फिचर्स आणण्याच्या तयारीत आहे. युजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅपमध्ये काळानुसार अपडेट येत आहेत.
व्हॉट्सअॅप मेसेजिंग अॅपमध्ये लवकरच पाच नवे फिचर्स येणार आहेत. व्हॉट्सअॅपच्या या नव्या अपडेटमुळे कॉलिंग आणि चॅटिंगमध्ये मात्र बदल होणार आहेत.
व्हॉट्सअॅप लवकरच ग्रुप अॅडमिनसाठी आणखी कंट्रोल जारी करण्याच्या तयारीत आहे. कम्युनिटीज तयार करण्यासाठी व्हॉट्सअॅप नवं फिचर जारी करू शकतो.
नव्या कंट्रोलच्या मदतीने अॅडमिन ग्रुपमधील इतर सदस्यांचे मेसेजही डिलीट करू शकतील. परिणामी अॅडमिनला ग्रुपवर येणाऱ्या मेसेजेसवर कंट्रोल ठेवायला मदत होणार आहे.
WABetaInfo नुसार कंपनी व्हॉट्सअॅप कॉल्स संबंधी अपडेट जारी करू शकते. यात कॉलिंग इंटरफेसमध्ये बदल होईल व ते अधिक आधुनिक आणि कॉम्पॅक्ट दिसेल.
व्हॉट्सअॅप बिझनेससाठी कंपनी लवकरच क्विक रिप्लाय शॉर्टकट हा पर्याय अॅड करू शकते. या अपडेटमुळे युजर्सना लवकर रिप्लाय करता येईल.
शिवाय व्हॉट्सअॅप चॅट्स आणि कॉल्समध्ये नवं इंडिकेटर येऊ शकत. यामुळे युजर्सना वेळोवेळी माहिती मिळत राहील. कंपनी लवकरच नवे फिचर्स जारी करण्याची शक्यता आहे.
सर्वात आधी बीटा वर्जनसाठी हे रिलीज केलं जाईल आणि त्यानंतरच बाकी युजर्ससाठी रिलीज केलं जाणार आहे. हे नवं वर्जन सुरक्षित व एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहे.
व्हॉट्सअॅपचे जगभरात युजर्स आहेत. कंपनी वेळोवेळी देत असलेल्या नव्या अपडेट्समुळे व्हॉट्सअॅप सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे.
महत्वाच्या बातम्या-
नितीन गडकरींची मोठी घोषणा, ‘पुढील सहा महिन्यात…’
“…त्यात आमचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही फासावर लटकवून टाका”
सहावीच्या प्रश्न पत्रिकेत चक्क तैमुरचा प्रश्न; पालक आक्रमक
हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता
‘या’ भाजप नेत्याकडून नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी, म्हणाले…