‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी?’ म्हणत, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर ह.ल्लाबोल

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीवरून भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार ह.ल्लाबोल केलेला पहायला मिळाला. काल शुक्रवारी स्वातंत्र्यवीर सावकार यांची पुण्यतिथी होती. यानिमित्त मुख्यमंत्र्याच्या ट्विटर हॅन्डलवरुन सावकारांना अभिवादन करण्यात न आल्यानं नारायण राणेंनी चांगलाच ह.ल्लाबोल केला आहे.

नारायण राणेंनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. “काल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त सीएमओ महाराष्ट्र आणि मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक सोशल मीडियावरुन अभिवादन व्यक्त करण्यात आले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर म्हणजे हिंदुत्वाचा विसर. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी.” अशा शब्दांमध्ये ट्विट करत राणेंनी टिका केलेली पहायला मिळाली.

यापूर्वीही राणेंनी विविध मुद्द्यांवरून मुख्यमंत्री आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ”शिवसेना आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. स्वाभिमान आणि अभिमान नसलेली आताची शिवसेना आहे. साहेबांच्या वेळेला वेगळी शिवसेना होती, ”असं म्हणत राणेंनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टिका केली होती.

याचबरोबर नारायण राणे यांनी पूजा चव्हाण आत्मह.त्ये प्रकरणावरून देखील ठाकरे सरकारवर टीका केलेली पहायला होती. काही दिवसांपूर्वी राणे यांनी संजय राठोड हे काही संत आहेत का, अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली. तसेच, याप्रकरणी 11 ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या असून अद्यापही सरकारने कार.वाई का केली नाही, असा सवाल राणेंनी विचारला होता.

“कुठल्याही समाजाने अशाप्रकारे बला.त्काराच्या आ.रोपातील व्यक्तीच्या पाठिशी उभे राहू नये, असे आवाहनही राणेंनी केले. तसेच, हे सरकार शरद पवारांमुळेच बनलंय, त्यांच्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. उद्धव ठाकरेंपेक्षा राज्यातील कुठलाही सरपंच हुशार आणि कायद्याचं अधिक ज्ञान असणारा आहे”, असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

 

महत्वाच्या बातम्या –

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘या’ आंतरराष्टीय पुरस्कारानं होणारं सन्मान

सोनं खरेदी करु इछिणाऱ्यांसाठी खुशखबर! तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी घसरलं सोनं

SBI मध्ये खाते असल्यास तुम्हाला मिळू शकतं स्वस्तात पेट्रोल; जाणून घ्या धम्माल ऑफर!

मोठी बातमी! संजय राऊत यांच्याविरोधात महिलेची हाय कोर्टात धाव, केले ‘हे’ गंभीर आ.रोप

आररर…! नजरेनं तरुणांना घायाळ करणारी नॅशनल क्रश प्रिया पडली धपकन; पाहा व्हिडिओ